ऍन्टी करप्शन कमिटी उर्फ भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दत्तात्रय जाधव

बारामती(वार्ताहर):ऍन्टी करप्शन कमिटी उर्फ भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय जाधव तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद रामचंद्र बांदल यांची निवड करण्यात आली.

नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र द्विवेदी व महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब इतापे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून गौरविण्यात आले.

जाधव हे बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी गावचे आहेत. चोख व तत्पर जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी बजावली होती.

अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचाराच्या विरोधात लक्ष देणार असून सर्व सामान्यांचे प्रश्न कमिटीच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे नननिर्वाचित श्री.जाधव यानी निवडी प्रसंगी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!