बारामतीत भाजपा पु.जि.ग्रा.अनुसूचित जाती मोर्चाची मागणी
बारामती (वार्ताहर): वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात जातीवादी भावनेतून अमानुष मारहाण करीत प्राणघातक हल्ला करणार्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी बारामती भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चाने उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंती दिनानिमित्त बॅनर लावल्यामुळे यांचा राग मनात धरून मातंग समाजावर काही समाजकंटकांनी हल्ला केला.
फुले-शाहू-आंबेडकर यांना आपला आदर्श मानणार्या महाराष्ट्रात माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून संबंधित समाजकंटकांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कोठरात कोठर शिक्षा द्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे
या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा पुणे ग्रामीणचे चिटणीस साजन अडसुळ, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडियाचे सहसंयोजक अक्षय गायकवाड, सोशल मीडिया अनुसूचित जाती मोर्चाचे संयोजक सचिन मोरे, शैलेश खरात, सागर भिसे व पदाधिकारी उपस्थित होते.