विद्यार्थ्यांनी तात्पुरता मोह आणि चंगळवाद यापासून दूर राहून डोळसपणे विद्यार्थीजीवन जगण्याची गरज -सौ.सुनंदा पवार

शारदानगर(वार्ताहर): विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करताना मोहापासून आणि चंगळवादापासून दूर राहून डोळसपणे आपले विद्यार्थीजीवन व्यतीत करावे असे मार्गदर्शन ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी केले.

शारदानगर शैक्षणिक संकुलात इयत्ता 11 वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

घेतलेली ज्ञानशाखा मनापासून घेतली आहे ना हे तपासा, पुस्तकी किडे न होता आपल्याकडील इतर गुणांना वाव द्या, आहार आणि व्यायाम यावर लक्ष द्या, सकारात्मक विचारांची कास धरा अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. याप्रसंगी महाविद्यालयात होणार्‍या विविध उपक्रमांसंबधी विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.वाय.बी. डुंबरे यांनी केले. तसेच चकढउएढ, छएएढ-गएए या प्रवेश परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त करणार्‍या व विद्यार्थ्यांचा सत्कार सौ.पवार यांचे हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी यशस्वी विद्यार्थी आणि पालक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये केतकी जगताप, सानिका कोकरे,धनश्री वाघमोडे, गीतांजली जगदाळे, मानसी कदम, प्रेक्षा शहा, अंकिता भापकर, प्राची गुजरे व प्रथम राठी हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा शिंदे आणि संजीवनी निकुंम्ब यांनी केले. आभार प्रदर्शन जुई बारटक्के हिने केले. या प्रसेंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.साठे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. महामुनी, एच.आर. प्रमुख गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, प्रा.शरद ताटे व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!