बारामती(वार्ताहर): दि मुस्लीम को-ऑप बँक लि., पुणे पंचवार्षिक निवडणुक डॉ.पी.ए. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली अवामी महाज पॅनेलचे बारामतीचे अधिकृत उमेदवार आलताफ सय्यद यांच्या प्रचारास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि.26 नोव्हेंबर 2021 संविधान दिन दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून प्रचारास सुरूवात करण्यात आली. यावेळी मुजावरवाडा, गुनवडी चौक, पानगल्ली या भागातील सभासद बांधवांना भेटून अवामी महाज पॅनेलचे पत्रक देवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
आलताफ सय्यद यांनी गेल्या पाच वर्षात बँकेचे सभासद वाढविले, सभासदांना कर्ज स्वरूपात आर्थिक मदत केली. जुने-नवे कर्जाचे रूपांतर करून रूतलेला संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत केला. यामुळे बँकेच्या माध्यमातून सभासदांचे अतुट असे जाळे निर्माण केले आहे.
गेली 45 वर्ष डॉ.पी.ए. इनामदार बँकेचे कामकाज पाहत आहेत. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात शैक्षणिक, बँकींग, कला व क्रीडा इ.क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. 27 एकरात आझम कॅम्पस पुणे येथे शैक्षणिक संकुल स्थापन करून शिक्षणाचे विविध दालने खुली करून दिली. 28 हजार विद्यार्थी या शैक्षणिक संस्थेला लाभ घेत आहेत. बँकेने 31 मार्च 2021 अखेर 602 कोटीच्या ठेवी जमा, 305 कोटींचे कर्ज वाटप, 2 कोटी 88 लाख रूपये नफा, बँकेला ऑडीट वर्ग-अ, सभासदस संख्या 28 हजार 365 आहे. एवढी बँक प्रगतीपथावर असताना मग भ्रष्टाचार कुठे झाला असेही सभासदांमध्ये बोलले जात आहे. आज बँक टिकविण्याचे काम कोणी केले त्यास विसरून चालणार नाही.
सतत नववव्या घटना दुरूस्तीमुळे बँकींग क्षेत्रात संचालक मंडळास व बँकेचे अधिकारी व कर्मचार्यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. ज्याला घरात, समाजात कवडीची किंमत नाही असे दंड थोपटत बँकेच्या निवडणूकीच्या मैदानात विरोधात उतरल्याचे सभासदांमध्ये बोलले जात आहे.
यापुढे बँक टिकावी, चोख व्यवहार व्हावे, सभासद, खातेदार, ठेवीदारांचा संचालक मंडळावर विश्र्वास निर्माण व्हावा असे वाटत असेल तर अवामी महाजच्या तमाम उमेदवारांना एकमताने निवडून द्या असेही प्रचार करताना उमेदवार बोलताना दिसत आहे.