बारामती(वार्ताहर): विवाहसोहळ्यात शाल,श्रीफळ,पुच्छगुच्छ व फटाक्याचा अनावश्यक खर्च टाळून सत्काराला महिला आणि बालकांशी संबंधित कायद्याची पुस्तके वाटून समाजापुढे नवा आदर्श नवरी मुलीचे वडील ऍड.अमीर शेख यांनी घालून दिला आहे.
28 नोव्हेंबर 2021 रोजी नाजनीन आणि साहिल यांचा विवाह सोहळा अनुसया गार्डन मंगल कार्यालय, गुनवडी,बारामती येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. सव्वा लाख रूपयांची 500 पुस्तके लग्नात येणार्या सर्वांना भेट म्हणून दिली.
समाजामध्ये महिला व बालकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने महिला व बालकांसाठी अनेक कायदे केले आहेत परंतु त्या कायद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नाही तरी या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना महिला व बालके यांच्या कायद्याची माहिती व्हावी व महिला व बालकांना कायद्याने मिळणारे अधिकार सर्वसामान्य नागरिकांना समजावेत हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुस्तके वाटप केली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विवाहसोहळा कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून पार पाडण्यात आला.