राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आज इंदापूर शहरातील संविधान स्तंभ या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी भारतीय लोकशाही अजून बळकट करण्याची शपथ घेतली.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटीलांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन देशामध्ये समता आणि समानता प्रस्थापित करण्याचे खूप मोठे ऐतिहासिक काम केले आहे.संपूर्ण जगामध्ये आपले संविधान सर्वश्रेष्ठ व आदर्शवत असून विषमतेची दरी यानिमित्ताने काढून टाकण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.याचा निश्चितपणे अभिमान आपल्या सर्व भारतीयांना असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कार्याध्यक्ष अतुल झगडे, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार,पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर,राष्ट्रवादी पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सचिन खामगळ, राष्ट्रवादी युवतीच्या तालुकाध्यक्षा अश्विनी कुर्डे-राऊत, राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे, नवनाथ रुपनवर, दिलीपराव वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सुभाष डरंगे-पवार, नगरसेवक अनिकेत वाघ,स्वप्नील राऊत, माजी नगरसेवक सुधीर मखरे, श्रीधर बाब्रस, दादासाहेब सोनवणे,राष्ट्रवादी युवकचे इंदापूर शहराध्यक्ष इम्रान शेख, इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष महादेव लोखंडे, युवा कार्यकर्ते गोविंद पाडुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!