खेळाडूंनी जनशक्तीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात वाटचाल करावी – हर्षवर्धन पाटील

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): खेळाडूंनी जनशक्तीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात वाटचाल करावी असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतवर्षा निमित्त आणि फिट इंडिया उपक्रमांतर्गत मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय मास्टर गेम्स्‌च्या उद्घाटन करते समयी श्री.पाटील बोलत होते.

यावेळी राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेचे अध्यक्ष दिपू के, उपाध्यक्ष सुनील जाधव, पुणे जिल्हा मास्टर गेम्सचे सचिव महेंद्र बाजारे, कोषाध्यक्ष केतान डिसल्वा, वरिष्ठ सचिव प्रभाकर दुबे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, संस्थेचे खजिनदार ड.मनोहर चौधरी, सहसचिव प्रा.बाळासाहेब खटके, संचालक विलासबापू वाघमोडे, तुकाराम जाधव, गणपत भोंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी व ग्रामीण भागातील खेळाडू घडविणारी संस्था आहे. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे. या संस्थेचे बलशाही युवक निर्माण करणे हे ब्रीद वाक्य आहे. या स्पर्धेत विजयी खेळाडूंची निवड तेलंगणा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. अशा स्पर्धा इंदापूरमध्ये होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. स्पर्धेमध्ये भाग घेणे हा पहिला गुण आहे.

यावेळी राज्यस्तरीय मास्टर गेम्सचे सचिव बाळा चव्हाण तसेच राष्ट्रीय खेळाडू आणि आयकर अधिकारी सुजित बडदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रथमत: हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आले. 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2021 पर्यंत चार दिवसीय मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक बापू घोगरे यांनी आभार मानले.

30 वर्षे वयोगटाच्या पुढील या स्पर्धा आहेत. यामध्ये थलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन सायकलिंग, फुटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल यासारख्या क्रीडा प्रकाराचे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!