बारामती(वार्ताहर): बारामती शहरांमध्ये मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरी करीत असताना आकाश विठ्ठल पाटोळे यास नागरीकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाटोळे मेडिकल दुकानाची चोरी करीत असताना त्यास नागरीकांनी पकडले असता, भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो खाली पडून जखमी झाला. पोलिसांनी महिला हॉस्पिटल बारामती येथे उपचार कामे दाखल केले व सदर जखमीस अधिक चौकशी केली असता सदरच्या इसमाने पाटील मेडिकल मोतीबाग बारामती येथे चोरी करण्यात आल्याची कबुली दिली. आरोपी पाटोळे याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे 21 गुन्हे दाखल आहेत. आरोपी पाटोळे यांचेकडून रोख 2 हजार 100 रुपये तसेच तसेच पुणे शहरातून चोरी केलेली एक पांढरे रंगाची स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अरुण रासकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहा.फौजदार अरुण रासकर, संजय जगदाळे, पोना.कोळेकर पोकॉ. तुषार चव्हाण, बंडू कोठे, मनोज पवार यांनी केली आहे.