बारामती(वार्ताहर): कोजागिरी पौर्णिमा पासुन श्री विठ्ठल मंदिर तांदुळवाडी वेस येथील मंदिरात पहाटे एक महिना मधुर सूर निनादत व टाळ मृदुंगच्या गजरात काकडा आरतीचे समारंभ करण्यात आला होता.निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो अशी समजूत आहे.
पहाटे 5 वा. काकडा आरती, 5.30 ते 6 पर्यंत अभिषेक व 6 ते 7.15 भजन असा एक महिना दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आला. भजनकरी रामभाऊ धोकटे व सर्व मित्र परिवारांना दररोज चहा व नाष्ट्याची सोय उपस्थित सर्व महिलांनी मिळून केली होती.
मंदिर सजविणे, रांगोळी काढे यामध्ये सौ.पांढरे, सौ.जगताप, सौ.सावंत, सौ.सोमाणी इ. सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पुजारी गणेश वनारसे यांना साथ देत अखंड काकडा समारंभ महिनाभर मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. 20 ऑक्टोंबर रोजी सुरू झालेला कार्यक्रम 20 नोव्हेंबरला काकडा आरतीची सांगता झाली व शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी, आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरतीमागील खरा उद्देश असू शकतो. यामध्ये आरोग्यविषयक भावना निश्र्चितच दडलेली आहे. परंतु, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आहे व तरूणांची संख्याही कमी होत गेली आहे.