अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्षा सुजाता सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, महासचिव सुरेश सोनवणे, पर्यटक प्रमुख गजभारे सर, सचिव सचिन दादा गायकवाड व प्रसिद्धी प्रमुख सावंत सर यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
इंदापूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष गौतम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी खरात सर, सचिवपदी प्रकाश कांबळे, संपर्कप्रमुख तानाजी साळवे, संघटक तसेच भैय्यासाहेब शिंदे, शुभम मखरे, प्रेम कुमार चितारे, सौदागर चितारे, इंदापूर तालुक्यामधील व शहरांमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्षा सुजाता सोनकांबळे म्हणाल्या की, गौतम बुद्धांचे विज्ञानवादी विचार घराघरापर्यंत पोचवायचे आहेत आपल्याला मोठे मोठे कॉलेज, शाळा, हॉस्पिटल, विहारे मोठ्या प्रमाणात संघटनेच्या माध्यमातून उभी करायचे आहे तसेच समाजामधून उद्योजक घडवायचे आहेत व तालुक्यामध्ये काम कसे करायचे यावर ती मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोनवणे यांनी केले. आभार सचिनदादा गायकवाड यांनी केले.