अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): उत्तर प्रदेश व पंजाब निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कृषी कायदे रद्द केल्याने केंद्रातील भाजपा सरकार अविश्र्वासहार्य असल्याचे परखड मत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना मखरे म्हणाले की, भाजपा सरकारने शेतकर्यांची नव्हे तर कामगार, विद्यार्थी यांची घोर फसवणूक केली आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी याच भाजपा पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात जातीनिहाय जनगणना करू असे म्हटले होते. निवडणुका झाल्या की, दिलेल्या आश्र्वासनाला काळीमा फास थेट सुप्रिम कोर्टात आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही असे प्रतिज्ञापत्र सादर केले. ओबीसी प्रवर्गातून 314 आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घरी बसविण्याचे पाप याच भाजपा सरकारने केले आहे त्यामुळे हे सरकार किती विश्र्वासास पात्र आहे हे दिसत आहे. त्यामुळे जे कृषी कायदे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रद्द केले तेच कायद्याबाबत निर्णयात बदलही करू शकतात असेही ते म्हणाले .
बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले होते 10 डिसेंबरला ओबीसी जातनिहाय जनगणना तसेच शेतकरी विरोधी कृषी कायदे व इतर मुद्यावर भारत बंदचे आवाहन केले होते त्याचा मोठा दबाव सरकारवर असल्याचे या निर्णयातून दिसून येत असल्याचेही मखरे यांनी यावेळी सांगितले.