अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): शेतकर्यांच्या हिताला बाधा ठरणार्या काळे कृषी कायदे अखेर रद्द होऊन, शेतकर्यांसाठी एक ऐतिहासिक विजय दिवस ठरला असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्विट करून आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषि विषयक कायदे माघारी घेत असल्याची घोषणा केल्यानंतर राजकिय वर्तूळातून विविध प्रतिक्रिया उमटण्यस सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.
श्री.भरणे यांनी सुद्धा अखेर शेतकर्यांच्या एकजुटीचा विजय झाला. शेतकर्यांच्या हिताला बाधा ठरणार्या काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेले वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनाचा हा ऐतिहासिक विजय आहे. या लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या शेतकरी बांधवाना मी नमन करतो! असे म्हटले आहे.