उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घाडगेवाडी येथील पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन

बारामती(उमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटी आणि त्रिंबक विविध कार्यकारी सोसायटीच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश चव्हाण, त्रिंबक सोसायटीचे संस्थापक चेअरमन बाबुराव चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. पवार यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि भारताचे आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, घाडगेवाडी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी पतसंस्था अ वर्गामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. विकास सोसायट्या ह्या ग्रामीण भागाच्या आर्थिक नाडया आहेत. शेतकर्‍यांना या सोसायट्यांचा फायदा होऊन ग्रामीण भागात आर्थिक सुब्बत्ता आली पाहीजे.

त्रिंबक विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पारदर्शक आणि लोकाभिमूख काम करुन संस्थेची प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाबाबत बोलतांना श्री. पवार म्हणाले की, सर्व नागरिकांनी दोन्ही लसीचे डोस घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग अजून गेलेला नाही. सर्वांनी मास्क वापरणे, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चिन व रशियामध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. लस घेतल्याने अपाय होत नाही. लसीकरणाबाबत सर्व संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बारामती येथील विकासकामांची पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकार्‍यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

श्री. पवार यांनी आज मौजे कन्हेरी येथील बारामती तालुका फळ रोप वाटीका, कन्हेरी गावठान येथील रस्त्यांचे काम, पंचायत समितीच्या नवीन इमारत, तीन हत्ती चौक येथील कॅनलवरील ब्रीज, ख्रिच्छन कॉलनी येथील कॅनलवरील पुलाचे सुरू असलेल्या कामांची कामाची पाहणी केली. यावेळी एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!