बारामती(वार्ताहर): महाराष्ट्रामधील सर्वात मोठी तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून बारामती प्रिमियर लीग (इझङ) याकडे पाहिले जाते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या दिमाखात सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. केजिएफ संघ बारामती प्रिमियर लीग चषकाचा शेवटी मानकरी ठरला.
बारामतीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर दि.30 ऑक्टोबर ते दि.7 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अभिजित कांबळे, योगेश व्हटकर, सूरज(पप्पू) अहिवळे, रविंद्र(पप्पू)सोनवणे यांच्या मुख्य आयोजनाखाली सदरील स्पर्धा पार पाडली गेली.
स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये केजिएफ या संघाने प्रथम क्रमांक 1 लाख रूपये आणि चषक तर द्वितीय क्रमांक शिवरत्न विनर्स या संघाने 60 हजार रूपये आणि चषक, तृतीय क्रमांक सुपर स्ट्रायकर या संघाने 40 हजार आणि चषक आणि चतुर्थ क्रमांक डि. जी. लायन या संघाने रक्कम 25 हजार आणि चषक पटकवला.
अनेक वैयक्तिक बक्षिसे देखील यावेळी मोठ्या प्रमाणात देण्यात आली.बारामती प्रीमियर लीग या स्पर्धेने अनेक नामवंत खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला दिले अशी चर्चा सर्वच क्रिकेट प्रेमीमधून आज होऊ लागली आहे. त्यामुळेच या स्पर्धेचे यश पाहून केवळ बारामतीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आज बारामती प्रीमियर लीग सारखे सामने आयोजित करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. बक्षीस समारंभा शेवटी स्पर्धेसाठी मदत करणार्या सर्वच दिलदार व्यक्तींचे आणि आमराई बॉईज क्रिडा प्रतिष्ठानच्या खेळाडूंचे आभार रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी आयोजक कमिटी मार्फत मानले.