सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनाचे सुशोभिकरण होणार स्थानिक नगरसेवकाच्या पाठपुराव्याने काम मार्गी

बारामती(वार्ताहर): गोर-गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या शुभकार्यासाठी पसंतीचे सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, सटवाजीनगर या इमारतीच्या सुशोभीकरणचा शुभारंभ बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सांस्कृतिक भवन इमारतीचे सुशोभीकरण करावे अशी मागणी माजी नगरसेवक सुधीर सोनवणे यांनी केली होती. त्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक व गटनेते सचिन सातव व माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात आले.

कार्यक्रमासाठी बा.न.प. बांधकाम विभागाचे सभापती सत्यव्रत काळे, माजी नगरसेवक सुधीर सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे नगरसेविका सौ.संगिता सातव, सौ.कमल कोकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, निलेश मोरे, राहुल साबळे, नागेश कासार, महादेव दळवी ठेकेदार संग्राम काळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!