बारामती(वार्ताहर): दरवर्षीप्रमाणे ह.मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अखिल आमराई मुस्लीम जमातीचे वतीने रूग्णांना बिस्कीट, फळे वाटपाचा कार्यक्रम बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन आमराई मुस्लीम जमातीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा सरचिटणीस शब्बीर शेख हे अखंडीत करीत आलेले आहेत.
या कार्यक्रमास सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.सदानंद काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ.चंद्रकांत म्हस्के, डॉ.बापू भोई, प्रा.ज्ञानेश्र्वर बुरूंगले इ. मान्यवर उपस्थित होते.
महंमद मुलाणी, हमीद मुलाणी, अजिज बागवान, आमराई बुथ अध्यक्ष चंद्रशेखर बोलके, सामाजिक कार्यकर्ते सागर सोनवणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे इन्चार्ज डॉ.सौ.थोरात, सौ. रूपनवर, सौ.तांबे सर्व डॉक्टर व नर्सिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार शब्बीर शेख यांनी मानले.