शारदानगर(वार्ताहर): द डिझाइनर क्लास मुंबई सोबत ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने महाविद्यालयातील होम सायन्स विभागातील तसेच इच्छुक इतर विद्यार्थिनींकरीता फॅशन डिझायनिंग मधील अद्यावत प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार (MOU) केला आहे. सदर कराराचे आदान प्रदान चेअरमन (ADT) राजेंद्र पवार व द डिझायनर क्लासचे सीईओ डॉ. देवेंद्र पुणतांबेकर यांनी केले.
शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून होमसायन्स विभागा अंतर्गत खालील कोर्स ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत यामधे खालील नामवंत डिझाइनर मार्गदर्शन करणार आहेत.
फॅशन डिझाइन-मसाबा गुप्ता, कुणाल रावल तसेच रहिया कपूर (ब्रांड बिल्डिंग), तान्या घावरी (फॅशन स्टायलिंग), जयंती रेडी (सस्टेनेबल फॅशन), पायल सिंघल (फॅशन डिझाइन)
फोटोग्राफी जोसेफ राधिक (वेडिंग फोटोग्राफी), रोहन श्रेष्ठा (फेशन फोटोग्राफी)
ज्वेलरी डिझाइन काबीया आणि साशा गरेवाल ( फाइन फेशन ज्वेलरी), बंटी बजाज (फाइन फेशन डिझाइन), फराह खान (फाइन ज्वेलरी)
वेडिंग मॅनेजमेंट मिहिका बजाज (वेडिंग व इव्हेंट मेनेजमेंट), देविकानारायण (वेडिंग मेनेजमेंट) इंटिरियर डिझाइन गौरी खान (इंटिरियर डिझायनर), मेकअप मिकी कॉन्ट्रॅक्टर (मॅकअप Intalks with)
वरील सर्व कोर्सचा कालावधी एक वर्षाचा राहील, तसेच 12 वी उत्तीर्ण विज्ञान, कला, वाणिज्य यासारख्या कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी फॅशन डिझाइन व इतर वरील कोर्स घेऊ शकतात. या कोर्सच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील मुलींना राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध तज्ञ व्यक्तिचे दर्जेदार मार्गदर्शन लाभणार आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील मुलींना स्वतःचे अद्यावत व्यवसाय सुरु करता येईल तसेच नोकरीच्या संधी मिळतील. कोर्स पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त तज्ञ व्यक्तिची सही असलेले प्रमाणपत्र देण्यात येईल. अशी माहिती सामंजस्य कराराच्या निमित्ताने दिली गेली. हा कोर्स इंग्लिश, हिंदी, मराठी या भाषेत उपलब्ध आहे.
फॅशन उद्योग खूप मोठा व्यापक क्षेत्र आहे. या उद्योगाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विद्यार्थीनींमधील असलेली कल्पकता, सृजनशीलता आणि निणर्य क्षमतेला खूप वाव आहे.
अशा या वैशिष्टपूर्ण करारासाठी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे संस्थेचे राजेंद्र पवार, सी.ई.ओ. निलेश नलावडे, गार्गी दत्ता (HR), प्राचार्य एस. जे. साठे, उपप्राचार्य डॉ.श्रीकुमार महामुनी, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. परिमिता जाधव, होम सायन्स विभागप्रमुख प्रा.शुभांगी तवारे व होम सायन्स विभागातील सहकारी तसेच द डिझायनर क्लासतर्फे डॉ. देवेंद्र पुणतांबेकर, सल्लागार गीता कॅस्टिलिनो, रोहन हिरानंदानी उपस्थित होते.