मोफत ऍन्जीओग्राफी, ऍन्जीओप्लास्टी व मोफत बायपास सर्जरी शिबीर

बारामती(वार्ताहर): कै.रा.तु.भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठानचे एनएबीएच अग्रमानांकित गिरिराज हॉस्पिटल बारामती त्यांच्यावतीने पद्मविभुषण खा.शरदचंद्रजी पवार व सौ.प्रतिभाकाकी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.रमेश भोईटे यांच्या माध्यमातून 12 नोव्हेंबर ते 12 जानेवारी 2022 पर्यंत मोफत ऍन्जीओग्राफी, ऍन्जीओप्लास्टी व मोफत बायपास सर्जरी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

बारामती व आजूबाजूच्या सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शिबीरास येताना पूर्व तपासणी रिपोर्ट व औषधे, पिवळे/केशरी रेशन कार्ड आधार कार्ड/मतदान कार्ड घेऊन यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी गिरिराज हॉस्पिटल एसटी स्टँड नजिक,इंदापूर रोड बारामती गिरीराज हार्ट सेंटर-9673003014, रिसेप्शन-9225583371, पराग दूधाळ-9420499219, प्रशांत भोसले-8530425511, हेल्पलाईन-9696330330.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!