माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती(उमाका): माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार विजय पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!