बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.17 मधील स्थानिक नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत चंद्रमणीनगर मधील बुद्धविहारात वधु-वरांसाठी खोल्या व बुद्धविहार आवारात खराब पेव्हर ब्लॉक जागी नवीन टाकणे या कामांचा भूमिपूजन नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीचा विकास होत आहे.
यावेळी उपगटनेत्या सौ.सविता जाधव, प्रभाग क्र.17 चे नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेविका सौ.अनिता जगताप, सौ.कमल कोकरे, मा.नगसेविका सौ.आरती शेंडगे, कल्पना शेलार, मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण, मा.पा.सवाणे गुरूजी, शंकर गव्हाळे, गजानन गायकवाड, अरविंद बगाडे, सतीश खुडे, आदित्य हिंगणे, कैलास शिंदे, तांत्रिक सल्लागार श्री.काटे, कंत्राटदार उत्तम धोत्रे, पत्रकार तैनुर शेख, विराज शिंदे, सिध्दांत सावंत, नितीन पवार, सुरज शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत स्थानिक नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांनी केले.