बारामती(वार्ताहर): मतदारांनो बँक म्हणजे एक काचेचे भांडे आहे. या काचेच्या भांड्याला तडा निर्माण करणार्यांना निवडून न देता हे भांडे सांभाळणार्यांना निवडून द्या अन्यथा कधी नाही मिळाले, गटकन गिळले या म्हणी प्रमाणे बँकेच्या प्रत्येक शाखेतील वस्तु सुद्धा काही मंडळी विकून स्वत:चा विकास करण्यास मागे पुढे पाहणार नाही असे मतदारांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून दिसून येत आहे.
दि बारामती सहकारी बँक लि., आणि दि मुस्लीम को-ऑप बँक लि., पुणे या बँकेच्या निवडणूकीची रणधुमाळी बारामतीत सुरू झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या मुलभूत गरजासाठी त्यांच्याच प्रयत्नाने उभ्या राहिलेच्या या दोन्ही बँकेने आपल्या विचारांची व आचरणाची कास कायम ठेवली आहे. आज या बँका उच्च शिखरावर पोहचल्या आहेत. वेगवेगळ्या धोरणांमुळे बँकेने सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्र्वासार्हता निर्माण केलेली आहे.
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत बँक ही महत्त्वाची संस्था असते. आधुनिक काळातील गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार हे मोठ्या प्रमामावर बँकांवर अवलंबून असतात. एखाद-दुसर्या दिवसासाठी जरी बँकांचे व्यवहार बंद राहिले, तरी देशाची आर्थिक व्यवस्था खीळ घातल्यासारखी होते. सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने आणि एकविचाराने समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसून प्रयत्न करणे, हे सहकाराचे तत्व होय. मात्र, काही टोळी याच सहकाराला गाढण्यासाठी पुढे आलेले आहेत. बँकांच्या मतदारांनी अशा टोळीच्या प्रलोभनाला बळी न पडता स्वच्छ कारभार करणार्याला निवडून दिले पाहिजे.
विरोधक हा सत्ताधार्यांचा खरा आरसा असतो. सर्वांना लोकशाहीने निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. बँक टिकली पाहिजे कारण या बँकेवर सर्वसामान्य नागरीक, लघु उद्योग, बँक कर्मचारी इ.उपजिवीका आहे. ज्याची प्रतिमा सार्वजनिक मंडळाचा अध्यक्ष होण्याची नाही त्याने जर अशा बँकांवर निवडून जाण्याची अपेक्षा ठेवत असेल व आम्ही बँकेचा कारभार चोख करून दाखवू अशी भाषा वापरीत असतील तर मतदारांनी ठरविले पाहिजे कोणाला निवडून द्यायचे व कोणता पॅनेल सर्वांचे भविष्य उज्वल करेन.