बारामती(ऑनलाईन): दि मुस्लीम को-ऑप बँक लि.पुणे पंचवार्षिक निवडणूक सन 2021-26 च्या शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.नामदार यांच्या नेतृत्वाखालील अवामी महाज पॅनेलचे अधिकृत उमेदवार आलताफ हाजी हैदरभाई सय्यद यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून, प्रचार धुमधडाक्यात सुरू करण्यात आला.
प्रथमत: हजरत चॉंदशाहवली बाबांना चादर, फुले वाहुन उपस्थित सभासद व मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. प्रचाराचा नारळ फोडण्याच्या तोबा गर्दी पाहुन आवामी महाज पॅनेल आताच निवडून आला असल्याचे उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनला.
यावेळी उपस्थित सर्व सभासद व मान्यवरांच्या हस्ते प्रचार पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये अवामी महाज पॅनेलच्या सर्व 17 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. एकच ध्यास..! मुस्लीम बँकेच्या सभासदांचा विकास..! हा अनमोल विचार देत प्रचार सुरू करण्यात आला.
28 हजार सभासदांना 26 शाखेद्वारे एकत्र ठेवणारे शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल म्हणजेच अवामी महाज पॅनेल आहे. जागृक सभासदांनी 50 वर्षापासून विश्र्वासहर्ता संपादन केलेल्या आवामी महाज पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पुन्हा संधी देवून आपल्याबरोबर बँकेचा देखील विकास साधावा असेही आवाहन या पत्रकात केले आहे.
यावेळी ऍड.अब्दुलकरीम बागवान, बारामती बँकेचे ज्येष्ठ संचालक शिरीष कुलकर्णी, हाजी कमरूद्दीन सय्यद यांनी आवामी महाज पॅनेलला व आवामी महाज पॅनेलचे उमेदवारांना विशेषत: बारामतीतून आलताफ सय्यद यांना का निवडून द्यायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. आलताफ सय्यद यांनी बँकेच्या माध्यमातून गोर-गरीब, होतकरू, लघु उद्योग व विद्यार्थ्यांना जे कर्जस्वरूपात मदत केली त्याबाबत उपस्थितांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.