बा.न.प.निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाची दखल घ्यावी कॉंग्रेस शहर युवकाध्यक्ष योगेश महाडीक यांची मागणी

बारामती(वार्ताहर): येणार्‍या बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाची दखल घ्यावी अशी मागणी कॉंग्रेस बारामती शहर अध्यक्ष योगेश महाडीक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, प्रदेशचे प्रवक्ते अरूण सावंत व आ.संजय जगताप यांना लेखी अर्जाद्वारे कळविले आहे.

त्यांनी दिलेल्या मागणी पत्रात म्हटले आहे की, राज्यात महाविकास आघाडी गेली एक ते दीड वर्षापासून चोख व सक्षमपणे कारभार चालवीत आहे. सरकार करीत असलेल्या घडामोडीवर विरोधक आगपखाड करताना दिसतात यावेळी विरोधकांना कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी जशास तसे उत्तरे देत आहेत.

ज्याप्रमाणे सरकार चालविताना आपण सर्व एकसंघ राहुन काम करता त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गाव, वाडीत या तिन्ही पक्षाने एक संघ राहून काम करण्याची गरज आहे. येणार्‍या बानपच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक घटक या नात्याने कॉंग्रेस पक्षाच्या काही उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!