राज्य विद्यार्थी वाहतुक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जहिद बागवान

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतुक महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी बारामतीचे जहिद महंमदहुसेन बागवान यांची राज्याचे अध्यक्ष पांडूरंग हुमने यांनी नियुक्तीचे पत्र देवून निवड केली.

यावेळी मुख्य सल्लागार हरिष बेकावडे, नगरसेवक अविनाश काळे, कार्याध्यक्ष तानाजी बांदल, सचिव संतोष गोळे यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

बागवान यांची महासंघाची समाजाप्रती व जनतेशी असलेली बांधिलकी व आपुलकी लक्षात घेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महासंघाचे नाते दृढ बळकट व एकजूट व्हावे व महासंघाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्य अविरत चालू रहावे तसेच महासंघाच्या वृक्षाची सावली सर्वत्र पसरावी या प्रामाणिक हेतूने त्यांची निवड करण्यात आली आहे.

जहिद बागवान यांनी तालुकास्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी वाहतुक करणार्‍या चालक/मालकांचे प्रश्र्न सतत शासन दरबारी मांडले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!