बारामती(वार्ताहर): उद्योगक्षेत्रात येऊन तरुणाई अनेक गरजू लोकांना रोजगार देत आहेत, तरुणांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक योगेश मंगलसेन बहल म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे पाडव्याच्या निमित्ताने यंदाही गोविंद बाग येथे शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. तसेच यावेळी त्यांनी कपूर ऍटोस्पेअर्सचे राकेश कपूर यांचे चिरंजीव दीपक कपूर यांनी सुरु केलेल्या नवीन आस्थापनेलाही सदीच्छा भेट दिली. अनेक गरजू कामगार तसेच कारागिरांना काम देण्यासाठी बारामाती औद्योगिक वसाहत येथे एलाईट सर्विसेस हे आस्थापन दीपक कपूर यांनी सुरु केल्याचा आनंद झाल्याचे यावेळी बहल म्हणाले.
यावेळी विरेंद्र योगेश बहल, संदीप दिघे, विवेक पाटील, महेंद्र शर्मा, शैलेश फाळके, गुलशन पाल, रविंद्र निला, विराज घोलप, अभिजीत चांदगुडे, अरबाज बागवान, वृषभ कपूर आदी उपस्थित होते.