उत्कृष्ठ निवेदक सलीम सय्यद विविध पुरस्काराने सन्मानीत

बारामती(वार्ताहर): प्रत्येक कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे सुत्रसंचालन होय. कार्यक्रमा दरम्यान गडबड झाल्यास त्यास सावरून घेण्याची जबाबदारी सुत्रसंचालन करणार्‍यांवर असते असेच उत्कृष्ठ सुत्रसंचालक सतत हसतमुख, सकारात्मक आणि ऊर्जावान असलेले बारामतीचे सुपूत्र सलिम सय्यद यांना उत्कृष्ठ आरोग्य सेवा, टी.सी.कंपनीत प्रथम रँक व सर्वात प्रथम कुलू मनाली टूर अशा विविध पुरस्काराने त्यांना माय लाईफ स्टाईल मार्केटींग ग्लोबल प्रा.लि. कंपनीचे एक्झीकेटिव्ह डायमंड डी.एच.कदम यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. आयुर्वेद क्षेत्रामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाची असलेल्या कंपनीचे प्रथम मराठी डायमंड डी.एच. कदम यांच्या शुभहस्ते सय्यद यांचा सन्मान झाला आहे.

नुकताच बारामती क्लब याठिकाणी दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमास दुसरे आयटीसी लीडर आणि बीएमडब्ल्यू ओनर संजय वाबळे, मुंबईचे सीटीसी लीडर सुनिल पाटील, फलटणचे न्यू एनटीसी लीडर सुनिल भुजबळ, आरटीसी लीडर राजेंद्र कदम याशिवाय सय्यद यांना वरील सर्व पुरस्कार मिळणेसाठी वेळोवेळी मदत करणारे एसटीसी लीडर संतोष पवार इ. मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सय्यद यांना शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व चषक देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हजारोंच्या संख्येने कंपनीवर प्रेम करणारे नागरीक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वत: सलीम सय्यद यांनी करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता आपली बिझनेसमॅन ही ओळख त्यांनी निर्माण होवो अशी सा.एकता एक माध्यम परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!