हनीट्रॅप करणार्‍या महिलांना लक्ष करणार – गणेश इंगळे

बारामती(वार्ताहर): विकासात्मक बारामतीत महिलांच्या छेडछाडी सारख्या घटना घडणार नाही, घडत असतील तर झालेला विकास अर्थहीन ठरल्याशिवाय राहत नाही असे म्हटले जाते. मात्र काही महिला आर्थिक हेतूसाठी रोमँटीक किंवा लैगिक संबंधाचा वापर करीत असतील तर अशा हनीट्रॅप करणार्‍या महिलांना लक्ष करणार असल्याचे नव्याने पदभार स्विकारलेले बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बोलताना सांगितले.

.ते पुढे बोलताना म्हणाले की, कोणताही अवैध व्यवसाय सुरू असेल तर त्यास राजकीय व पोलीसांचा वरदहस्त असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जाते मात्र, येथील नेते, मंत्रीच या विरोधात असल्याने यापुढे असे ऐकावयास मिळणार नाही.

बारामतीत पार्किंगचा प्रश्र्न मोठा आहे. वाहनांमुळे रस्त्यावरील होणारे अतिक्रमण दूर करून, वाहतुकीचे सुरळीत नियोजन करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बारामती शहर व परिसरात गावठी दारू, मटका, गुटखा, अवैध वाळू, जुगार, गांजा, वेश्याव्यवसाय, सावकारी या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.

पोलीसांच्या कारवाईनंतर अवैध धंदे पुन्हा सुरू ठेवले जातात असे म्हटले जाते. मात्र, दोन गुन्हे असणार्‍यांना यापुढे महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिविटी) यानुसार कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अवैध मार्गाने कमविलेल्या मालमत्तेवर वेळपडल्यास टाच सुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही. तसा बॉंड लिहुन घेणार, तरी अवैध धंदे, गुंडागिरी केल्यास बॉंड रद्द करून कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अवैध धंदे करणार्‍यांची माहिती मिळताच अवैध धंदे सुरू करणारा खरा मास्टर माईंडवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अवैध धंदे आपल्या आसपास सुरू असतील तर थेट माझ्याकडे माहिती देण्याचे आवाहन करून बारामती इंदापूर तालुक्यातील अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!