अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले असून त्यांच्या अंत्यविधीला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
व्याख्याने, नाटक आणि लिखाणाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोचण्याचे मोठे कार्य इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. थोर इतिहास संशोधकास श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.