अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): अनिरूद्ध फूटवेअर दुकानातील चोरी इंदापूर पोलीस स्टेशनने तांत्रिक पुराव्यानुसार चोरी उघडकीस आणून अजय गणेश जठार (रा.निमगांव केतकी, ता.इंदापूर) यास अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.7 नोव्हेंबर 2021 रोजी निमगांव केतकी येथील अनिरूद्ध फूटवेअर दुकानातील गल्ल्यामधील 40 हजार रूपये अज्ञात चोरट्याने विना संमती चोरल्याची फिर्याद दुकानाचे मालक अनिरूद्ध भारत मोरे (वय-21, रा.निमगांव केतकी, ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला 9 नोव्हेंबर 2021 रोजी गु.र.नं.986/2021 नुसार भा.द.वि.कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पो.स.ई. दत्तात्रय लिगाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. ए.डी. खैरे व पो.ना. आर.बी. शिंदे यांनी सखोल तपास करुन तांत्रिक पुरावा प्राप्त करुन त्यादिशेने तपास 11 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करुन आरोपीने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयातील चोरीस गेलेली रोख रक्कम 40,000 रुपये जप्त केली आहे.
गुन्हयाचा पुढील अधिक तपास पो.हवा. ए.डी. खैरे करीत आहेत.