बारामती(वार्ताहर): अंजनगाव (ता.बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराबरोबर मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
जागतिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अंजनगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास परकाळे व उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
इ.5 वी ते 8 वीच्या विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व कडधान्य वाटप करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या वतीने नागरीकांचे संरक्षण व्हावे म्हणून मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
Nice