शाहू हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

बारामती(वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्यूनइर कॉलेज बारामती विद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

                राष्ट्रीय हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाचे प्राचार्य अंकुश साळुंखे यांनी केले. तसेच ध्वजारोहणही करण्यात आले

       यावेळी उपप्राचार्या पी.व्ही. जाधव, शिक्षक प्रतिनिधी गणपत तावरे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य व राष्ट्रीय खेळाडू बी.एन.पवार,ज्ञानेश्वर कडीमणी, कु.पुजा सरतापे हे उपस्थित  होते. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाविषयक कामगिरीविषयीची माहिती उपशिक्षक एस.टी.राऊत यांनी माहिती दिली. तर विद्यालयाचे क्रीडा संचालक सुजित जाधव यांनी क्रीडा प्रतिज्ञेचे वाचन केले. प्राचार्य अंकुश साळुंखे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

                तर योगगुरू बाळकृष्ण सुतार यांनी शारीरिक तंदुरुस्तीची प्रात्यक्षिके करून घेतली.तर काही खेळाडूंची प्रात्यक्षिकेही यावेळी घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संयोजन क्रीडासंचालक सुजित जाधव तसेच ऑनलाईन प्रक्षेपण शिक्षिका एस.ए.सातव यांनी केले. त्यामुळे सदर कार्यक्रमात  शिक्षक विद्यार्थी व पालक या सर्वांना सहभागी होता आले.

                प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय ढवाण तर आभार नितीन पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!