लॉकडाउन पासून बंद असलेली बारामती-पुणे रेल्वे सेवा लवकर सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन : मनसेचा इशारा

बारामती(वार्ताहर): लॉकडाऊन पासून बंद असलेली बारामती-पुणे रेल्वे सेवा लवकर सुरू करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक व बारामतीचे स्टेशन अधीक्षक यांना लेखी पत्रान्वये देण्यात आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व महाराष्ट्रासहीत देशभरात वेळोवेळी पुकारण्यात आलेला लॉकडाउन यामुळे गेल्या वर्ष भरापासून बंद करण्यात आलेली पुणे- बारामती ही नियमित असणारी रेल्वे सेवा ही तात्काळ सुरू करण्यात यावी व प्रवाशांना दिलासा द्यावा.

महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलेली असतानाही मध्य रेल्वे प्रशासन अद्यापही पुणे-बारामती रेल्वे सेवा सुरू करत नसल्यामुळे दररोज पुणे बारामती प्रवास करणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे सर्व प्रवासी वाहतूक ठप्प पडली आहे. अशातच शासनाने घालून दिलेले रेल्वे प्रवासासाठीचे सर्व नियम घालून रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू केली पाहिजे अशी नियमितपणे पुणे-बारामती प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांची मागणी आहे.

जर या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार न करता रेल्वे प्रशासनाने जर ताठर भूमिका घेतली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यालयात ’आगळेवेगळे’ आंदोलन करेल असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती तालुका अध्यक्ष ऍड.नीलेश वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड.पोपटराव सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष स्वप्नील मोरे, ऍड.भार्गव पाटसकर, गोकुळ केदारी, प्रीतम तपकिरे व इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!