बारामती(वार्ताहर): श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर शाळेच्या एकाच बाकावर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने यशस्वी होऊन गेलेले सवंगडी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने दरवर्षी एकत्र येत असतात. आनंद, आश्र्चर्य आणि कौतुक असा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहर्यावर दिसत होते.
श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर शाळेतील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच हॉटेल सीटीइन याठिकाणी आनंदात साजरा करण्यात आला.
माजी विद्यार्थी सचिन भोईटे, किरण जगताप, विक्रम निंबाळकर, विजय काटे, तानाजी सपकळ, आप्पा क्षीरसागर, नाना शेंडगे इ. उत्तम असे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आपआपली खुशाली, अडी अडचणी मांडली. या माजी विद्यार्थी ग्रुपमुळे एकमेकांचे प्रश्र्न, व्यथा मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत व उपस्थित होणारे प्रश्र्न मार्गी सुद्धा लागले असल्याच्या प्रतिक्रीया सर्वांनी मनसोक्त मांडल्या.