बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम गाळा नं.11 सांस्कृतिक केंद्रा समोर बारामती येथे नव्याने सुरू झालेल्या एस.पी.स्पोर्टस् ऍण्ड न्युट्रीशन या दुकानाचे उद्घाटन नगरसेविका मयुरी शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बा.न.प.च्या उपगटनेत्या सविता जाधव, माजी नगरसेवक अभिजीत काळे, एस.पी.ग्रुपचे अध्यक्ष सुरज शिंदे, ऍड.उमेश शिंदे, पत्रकार विराज शिंदे, तैनुर शेख, उत्तम धोत्रे इ. मान्यवर उपस्थित होते.
एस.पी. ग्रुप च्या माध्यमातून युवकांचे जाळे निर्माण करून युवकांच्या अंगी असणार्या कला गुणांना वाव देण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून एस.पी.स्पोर्टस् क्लबची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. विविध ठिकाणी खेळात केलेल्या कामगिरीमुळे एस.पी.स्पोर्टस्चे नावलौकीक झालेले आहे. अमर भंडारे व शक्ती भंडारे यांनी एस.पी.स्पोर्टस् ऍण्ड न्युट्रीशन या दुकानाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाचे साहित्य, कपडे, शूज इ. माफक दरात उपलब्ध करून दिलेले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत एस.पी.स्पोर्टस् ऍण्ड न्युट्रीशन या दुकानाचे संचालक अमर भंडारे व शक्ती भंडारे यांनी केले व आभार व्यक्त केले.
नितीन मोहिते, सचिन जाधव, सचिन काकडे, विनोद सोनवणे, दीपक कुदळे, दिलीप तांबे, शिंदे साहेब, राजाभाऊ धोत्रे, अनिल जगताप, साजन अडसूळ, संतोष महाले, मंगलदास निकाळजे, सचिन गाढवे, प्रदीप खरात, अण्णा भोसले, सुरज कांबळे, कृष्णा जावडे, डॉ.राहुल चव्हाण, अभिजित सोनवणे, अनिकेत भैय्या, संदीप मोरे, प्रशांत भालेराव, अमोल भोसले, सुमित सोनवणे, महेश साबळे, रणजित पवार, विक्रांत अवधुते, पिंटू गायकवाड, अजय नागे, गौरव भंडारे, गोपी टिळेकर, सचिन पगारे श्रीकांत पाथरकर इ. मान्यवर उपस्थित राहुन दुकानास सदिच्छा भेट दिली.