बारामती(वार्ताहर): ओम साईच्या गजरात साईच्छा सेवा ट्रस्ट बारामतीच्या वतीने दरवर्षी बारामती ते शिर्डी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात पालखी काढण्यात आली नव्हती. यावर्षी पालखी सोहळा निघाल्याने साई भक्तांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
साईंच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी शिर्डीकडे मार्गस्थ झाली. माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे हे दरवर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करीत असतात.

एक ज्येष्ठ नागरीक काष्टी येथे दवाखान्यात जात आसताना त्यांचा मोबाईल हरविला होता. साईच्छा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बिरजू मांढरे व साई भक्त पालखी सोबत पायवारी करीत असताना रस्त्यात बिरजू मांढरे यांना मोबाईल सापडला. या मोबाईलमधील शेवटचा नंबर डायल करून सतिश काटकर याच्या वडिलांचा मोबाईल गहाळ झाला होता तो साईभक्त किरण बोराडे, प्रणय साळवे यांनी काटकर यांच्या ताब्यात दिला. काटकर यांनी आभार व्यक्त केले. साईंच्या विचारानुसार जे मी सांगितलेल्या मार्गावर जातील ते देवाच्या शरणात जातील असे उच्च विचार घेऊन साईच्छा सेवा ट्रस्टचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.