बारामती(वार्ताहर): शेतीबरोबर दुग्ध, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसाय जोडधंदा म्हणून केल्यास तो शेतीला आर्थिक बळ देणारा असल्याचे प्रतिपादन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला पवार यांनी केले.
ग्रोवेल फिश फिडस्चे तांबोळी ऍक्वाकल्चर सर्व्हिसेस या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या प्रसंगी ग्रोवेल फिश फिडस् कंपनीचे जयप्रकाश तिवारी, शिवाजी काळे, करण खलाटे, राहुल वाबळे, अनिल काटे, गुरूप्रसाद आगवणे, संग्राम मोकाशी, फिरोज बागवान, संगीता पाटोळे, शारदा खराडे, पूनम कांबळे, रफिक तांबोळी, गणेश दाभोळकर, ऋषिकेश पालवे इ. मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मत्स्यखाद्य व मत्स्य व्यवसाय वाढीसाठी शासन सुद्धा तरुणांना सहकार्य करीत आहे. इंदापूर बारामती फलटण परिसरमध्ये वाढते शेततळी व मत्स्यव्यवसाय मुळे मत्स्यखाद्य विक्री ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मत्स्य बीज, खाद्य, औषधे मिळण्यासाठी मोठ्या शहरात न जाता बारामतीमध्ये त्याच दरामध्ये उपलब्ध होणार असल्याचे ग्रोवेल फिश फिड्स कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
या वेळी मान्यवरांचे स्वागत तांबोळी ऍक्वाकल्चर सर्व्हिसेसचे संस्थापक फिरोज तांबोळी, अहमद तांबोळी, जहॉंगीर तांबोळी व निसार तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सिमरन तांबोळी यांनी मानले.