आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील भव्य स्पर्धा…
बारामती(वार्ताहर): सृजनतर्फे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आ.रोहित राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून खा.शरद पवार साहेबांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीनिमीत्त दिनांक 1 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात पार पडणार आहे.
मुख्य स्पर्धा व मुक्तछंद या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी तयार केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून आयोजकांपर्यंत पोहोचवता येतील, यंदाचे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.

महाराष्ट्रात दिवाळी सणानिमित्त घराशेजारी, आवारात गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याची परंपरा आहे. याच उपक्रमाला स्पर्धेचे माध्यम देऊन दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे दुसरे पर्व आयोजित करण्यात आले आहे. युवा पिढी ही आपल्या राज्याचे, देशाचे भवितव्य आहे असे पवार साहेब नेहमी सांगत असतात आणि त्याप्रमाणे काम करण्याची संधीही युवकांना देत असतात. याच दृष्टीकोनातून युवांमध्ये एक संघटनात्मकता व सकारात्मकता निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून त्यांच्यात सृजनशीलता निर्माण व्हावी, आपला सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच ऐतिहासीक महत्व दृढ व्हावे हा स्पर्धा आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/Durgraj2021 या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9696330330 या क्रमांकावर संपर्क करता येईल. पुणे, मुंबई, नाशिक, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात हि स्पर्धा होणार आहे. गडकिल्ले संवर्धन श्रेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभणार आहेत. मुख्यस्पर्धा व मुक्तछंद या दोन्ही गटांसाठी प्रत्येकी प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषीकांसह एकूण उत्तेजनार्थ अशी भरघोस पारितोषीके देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
मुख्य स्पर्धेसाठी व्हिडीओ पाठविण्याचे क्रमांक: पुणे: 9767653558, मुंबई:8788196129, नाशिक:7666948803, कोकण:9922263558, औरंगाबाद: 7666839951, अमरावती : 8767805228, नागपूर : 9579674597 मुक्तछंद गट मोबाईल क्रमांक: 7498905498