बारामती(वार्ताहर): जगामध्ये कडधान्यातील पहिले हायब्रिड वाण विकसीत करणार्या डॉ.अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांची ऑस्ट्रीयाच्या व्हिएन्नामधील युनाटेड नेशन्स ऑर्गनायझेशन च्या इंटरनॅशनल अँटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बालविकास मंदीर याठिकाणी माध्यमिक शिक्षण घेतले. बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुण्यात बी.एस्सी हॉर्टिकल्चर केले. जिनॅटिक्स व प्लँट ब्रिडींग या विषयात त्यांनी एम.एस्सीची पदवी घेऊन, राहुरी कृषी विद्यापीठात ऑस्ट्रीयामधील संस्थेत प्लँट म्युटेशन ब्रिडींगवर संशोधन करणार आहेत.
गेल्या सात वर्षामध्ये जगातील 19 देशांना तुरीच्या 18 वेगवेगळ्या प्रकार देण्याचे महत्वाचे काम डॉ.हिंगणे यांनी केले आहे. हे वेगवेगळे प्रकार देणार्या डॉ.हिंगणे एकमेव भारतीय महिला आहेत याचा सर्वांना अभिमान आहे.
पुण्यात एक वर्ष काम केल्यानंतर इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्युट फॉर द सेमी ऍरिड ट्रॉपिक (ICRASAC) हैद्राबाद या संस्थेत तूर पैदासकार शास्त्रज्ञ म्हणून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली. एशिया प्रोग्राम लीडर म्हणून त्यांनी या विषयात गेल्या चार वर्षापासून काम केले आहे. त्यांची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याने सर्वत्र डॉ.अनुपमा हिंगणे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. ऍड.जगन्नाथ हिंगणे यांच्या त्या कन्या होत.