एक हजार गरजुंना दिवाळी किट स्तुत्य उपक्रम – सचिन सातव

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती यांनी आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक हजार गरजुंना दिवाळी किट, 500 दिवाळी अभ्यंगस्नान किट व 500 महिलांना साडी वाटपाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांनी बोलताना व्यक्त केले.

या कार्यक्रमास नगरपरिषदेचे अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, आरोग्य विभागाचे सभापती सुरज सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, माजी नगराध्यक्षा सौ.भारती मुथा, बारामती बँकेचे संचालक शिरीष कुलकर्णी, माजी नगरसेवक नितीन बागल, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहरचे उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, निलेश मोरे, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे सातव म्हणाले की, सत्यव्रत काळे यांनी घेतलेल्या कामाची दखल घेण्यात येईल. वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवीत असतात.

या कार्यक्रमास पक्षाचे नेते उपस्थित राहिले असते तर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते कशापद्धतीने सामाजिक उपक्रम राबवितात हे समक्ष पाहण्यास मिळाले असते असे सौ.पौर्णिमा तावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, अशा उपक्रमांना कुटुंबाची साथ, पूर्वजांचा आशिर्वाद व उपस्थितांची साथ असेल तर असे कार्यक्रम होत असतात. अशा समाजोपयोगी कार्यक्रमातून शुभाशिर्वाद लाभत असतात. प्रभागातील नागरीकांचा विचार करीत त्यांना विविध प्रश्र्न उपस्थित केले व मार्गी सुद्धा लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इम्तियाज शिकीलकर, नवनाथ बल्लाळ, सिद्धनाथ भोकरे, तैनुर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले तर शेवटी आभार सत्यव्रत काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आई प्रतिष्ठानचे सदस्य नागेश कासार, रोहन माघाडे, मंगलभाऊ पवार, दीपक शिंदे शुभम माने, पंकज दळवी, रफिक शेख, सत्यजित काटकर, सचिन पलंगे, श्याम सूर्यवंशी, निलेश शेंडगे, विकास गायकवाड, नाना घाडगे इ. मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!