बारामती(वार्ताहर): गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या तीन हत्ती चौक ते परकाळे बंगला रस्त्याचा डांबरीकरण कामाचा शुभारंभ बारामती नगरीच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, स्थानिक नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती रमेश भोकरे, बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, नगरसेवक संजय संघवी, नवनाथ बल्लाळ, जयसिंग देशमुख, अमर धुमाळ, गणेश सोनवणे, माजी नगरसेवक नितीन बागल, अनिल कदम, अमजद बागवान, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, पांडूरंग चौधर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या रस्त्याचा डांबरीकरणाबरोबर साईडपट्टीला पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दत्त मंदीर- झगडे गॅरेज आप्पासाहेब पवार यांच्या बंगल्यामागे पलंगे मटण शॉपकडे जाणार्या रस्त्याचे डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संजय कदम, वीरधवल गाडे, सिद्धनाथ भोकरे, संतोष सातव, शफिक शेख, दादा माने, अरविंद मोरे, विजय ताटे, गजानन कदम, योगेश शेवाळे, बालाजी नाळे, दीपक कुदळे, महादेव दळवी, इम्रान पठाण, श्री.राऊत, शेवतीभई दोशी तसेच प्रभागातील स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.