पुणे जिल्ह्यातील निवडणूका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढविणार – विनोद भालेराव

बारामती(वार्ताहर): पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणूका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढविणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांनी मांडले.

बारामती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व आगामी निवडणुकांच्या संदर्भात पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री.भालेराव बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य सदस्या निर्मला वनशिव, वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भालेसेन, उपाध्यक्ष मालती बडेकर, महासचिव प्रियांका लोंढे, प्रशांती साळवे, ज्येष्ठ कर्यकर्त्या उषा वाघमारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.वैभव काळे, जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, निलेश वामणे, जिल्हा सल्लागार धीरज कांबळे, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, ऍड.रियाज खान, बारामती शहर अध्यक्ष अक्षय शेलार इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भालेराव म्हणाले की, येणार्‍या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मार्ग काढणार आहे. महिलांचे प्रश्न मांडून महिलांचे संघटन मोठ्या ताकतीने करणार असल्याचे सीमाताई भालेसेन यांनी सांगितले व आयोजकांचे कौतुक केले.

येणार्‍या पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका या सर्व निवडणुकामध्ये पक्ष बांधणी करुन वरिष्ठांच्या सूचनेनुसार उमेदवार उभे करणार असल्याचे मंगलदास निकाळजे यांनी सांगितले. यावेळी ऍड.वैभव काळे, निलेश वामणे, ऍड.रियाज खान यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पक्ष प्रवेशामध्ये बारामती शहरातील इतर पक्षातील व विविध संघटनेत काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यामध्ये रोहित पिल्ले, जितेंद्र कवडे, सिद्धार्थ पवार, ऍड. तुषार ओव्हाळ, प्रशांत सरतापे, योगेश आढाव, सोहेल सय्यद, अण्णा घोडके, अनिल जगताप, सुरज गव्हाळे, विक्रम थोरात, अमोल धेंडे, मोहन कांबळे, अमोल जगताप, सागर शेलार इ. पक्षात प्रवेश केला.

पक्ष देईल ती पुढील जबाबदारी मोठ्या ताकतीने पार पाडत पक्ष संघटन मजबूत करण्याचा संकल्प व ग्वाही जिल्हाध्यक्ष याना सर्व कार्यकर्त्यांनी दिली. शेवटी आभार अक्षय शेलार यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगलदास निकाळजे, ऍड.वैभव काळे, अक्षय शेलार, मयूर कांबळे, रोहित भोसले, विनय दामोदरे, मोहन कांबळे, ऍड. रियाज खान इ. मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!