बारामती(वार्ताहर): आमराई महात्मा फुलेनगर प्रभाग क्र.19 मध्ये पहिल्या अभ्यासिका वाचनालय बांधणे व ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते झाला.
यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बांधकाम समिती सभापती सत्यव्रत काळे, आरोग्य समिती सभापती सुरज सातव, महिला व बालकल्याण सभापती सौ.आशा माने, स्थानिक नगरसेवक नवनाथ बल्लाळ, बिरजू मांढरे, बबलू देशमुख, गणेश सोनवणे, नगरसेविका सौ.मयुरी शिंदे, सौ.विना बागल, सामाजिक कार्यकर्ते संतोष सातव, माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण, बबलू जगताप, कुणाल काळे, सचिन जगताप, राजेश पडकर, उत्तम धोत्रे, गणेश कदम, सलिम शेख, प्रशांत लांडे, धिरज पवार, विराज वाघमोडे, पत्रकार तैनुर शेख इ.मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. स्थानिक नगरसेविका अनिता जगताप यांच्या प्रयत्नातून व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून तरूण पिढीस शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन व परिसरातून अधिकारी वर्ग निर्माण होतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे.