अशोक घोडके यांजकडून…
इंदापुर (वार्ताहर): कोरोनाचा प्रादुर्भाव कुठे कमी होत नाही तो डेंगू व चिकनगुनिया सारख्या रोगराईने शहरात थैमान घातले आहे. त्यामुळे तातडीने या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्वरीत औषध फवारणी करावी असे इंदापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चमन बागवान यांनी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शहरामध्ये अनेक ठिकाणी डेंगू व चिकनगुनियाने रूग्ण त्रस्त आहेत. प्रभागनिहाय नगरपालिकेने औषध फवारणी त्वरित चालु करावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
या वेळी डॉ.संतोष होगले, जाकीर काझी, महादेव लोंढे, आकाश पवार, युवराज गायकवाड, नवनाथ गायकवाड इ. निवेदन देते समयी उपस्थित होते.
डेंगू व चिकनगुनियामध्ये सर्वसामान्य लक्षणे म्हणजे ताप आणि सांधेदुखी, इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांधे सूज येणे किंवा पुरळ येणे यांचा समावेश असू शकतो. चिकुनगुनिया आजारामुळे अनेकदा मृत्यू होत नाही, परंतु लक्षणे गंभीर आणि अक्षम होऊ शकतात. बहुतेक रुग्णांना आठवडाभरात बरे वाटते. काही लोकांमध्ये, सांधेदुखी अनेक महिने टिकू शकते. अधिक गंभीर आजार होण्याचा धोका असलेल्या लोकांमध्ये जन्माच्या वेळी संसर्ग झालेल्या नवजात बालके, वृद्ध प्रौढ (65 वर्षे) आणि उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार यासारख्या वैद्यकीय स्थिती असलेल्या लोकांचा समावेश होतो.