अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील बहिणींना असे ‘भाऊ’ मिळणे कठीण आहे मात्र, मामाने चक्क अंगणवाडी कर्मचारी भगिनींना 2 लाख 50 हजार रूपयांची रोख भाऊबीज देवून बहिणींचा सन्मान केला आहे.
इंदापूर तालुक्यातील सीटू संलग्न अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नूतन अध्यक्षा बकुळा शेंडे व पदाधिकारी यांनी 24 ऑक्टोंबर रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली.भविष्यासाठी शरद समृद्धी महिला नियोजन पतसंस्था सभासद नोंदणी व उभारणीची माहिती दिली. याबाबत दत्तात्रय भरणे यांनी कौतुक करीत यांचे हित पाहत पतसंस्थेसाठी 2 लाख 50 हजार रूपये रोख स्वरूपात दिले.
दिवाळीतील भाऊबिज दिवशी बहिणीच्या घरी ‘भाऊ’ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर पाहिल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. ‘भाऊ’ मग ओवाळणीचे ताटात ’ओवाळणी’ देऊन बहिणीचा सन्मान करतो. मात्र, यावेळी मामांनी मात्र भाऊच्या पुढचे पाऊल उचलून भाऊबिजची वाट न पाहता बहिणी करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला त्यामुळे इंदापूर तालुक्यात याबाबत एकच चर्चा रंगू लागली. यावेळी बहिणी आनंदाश्रु थांबवू शकले नाही.
यावेळी इंदापूर तालूका संघटनेच्या अध्यक्षा बकुळा शेंडे, उपाध्यक्षा सुदर्शना भुजबळ, सचिव बालिका राऊत यांनी राज्यमंत्री भरणे यांचे आभार मानले.