अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन संलग्न सिटु पुणे जिल्हा समिती इंदापूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी बकुळा शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी सुदर्शना भुजबळ यांची फेरनिवड झाली.
अंगणवाडी सेविका मदतनीस यांची निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी मंदिराच्या सभागृहात बैठक झाली. त्यात तालुक्याच्या संघटनेची कार्यकारणीची निवड झाली. अंगणवाडी सेविका मदतनीस प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी बकुळा शेंडे यांचा मोलाचा वाटा असल्याने सर्वानुमते त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
यामध्ये प्रमुख कार्यकारणी- कार्याध्यक्ष- स्वाती मांढरे, शोभा शिरसाट, खजिनदार- सुनीता कदम, सचिव- चित्रा नाडगोडा, सल्लागार-मंदा खारतोडे, शकुंतला भोसले, सीमा खामगळ कार्यकारणी-सुमन मदने, सविता कणसे, सुनंदा करे, राजश्री भिसे, पूजा पवार, सुनिता घोगरे, संगीता पवार, अंजली दीक्षित, लतिका बंडगर, छाया भोंग, संध्या नलवडे, वैशाली गारडे, दिपाली मिसाळ, रेखा चव्हाण, हसीना शेख, निशा चव्हाण, अलका माने, सविता भिंगरदिवे, निर्मला खुटाळे, सुरेखा निंबाळकर, दक्षता डावरे, मीना इंगवले, मीरा काळेल, मेघा भोंगळे, नंदा गोरे, नूरजान, साधना सोलंकर.