बारामती(वार्ताहर): पुणे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे ईद-ए-मिलादुन्नबी चे औचित्य साधून बारामती येथील ऑल इंडिया जमियतुल कुरेश व जामा मस्जिद बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने व ऑल इंडिया जमियतुल कुरेश पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभान कुरेशी यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे होते. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, माजी नगरसेवक हाजी अमजद बागवान, दक्षता समितीचे अध्यक्ष ऍड.अविनाश गायकवाड, हाजी शब्बीर कुरेशी, हाजी समद कुरेशी, ऍड.करीम बागवान, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाणपाटील, वतन की लकीरचे संपादक तैनुर शेख, एकता एक माध्यमचे संपादक परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, बाबा कुरेशी, हाजी शाकीर कुरेशी,वसीम कुरेशी,नदीम कुरेशी, मुजाहिद शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी किरण गुजर, नामदेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी शब्बीर कुरेशी यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत वसीम कुरेशी व गुफरान कुरेशी यांनी केले. आभार सुभान बाबा कुरेशी यांनी मानले.