बारामती(वार्ताहर): वंचित बहुजन आघाडी बारामती तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.
येत्या काही काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या आहेत. या निवडणूकांबाबत आढावा आणि नियोजनासाठी तसेच रविवारी दि.24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. घेण्यात येत असलेल्या भव्य पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाबाबत नियोजन करण्यासाठी बारामती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. पक्ष बांधणी, आगामी निवडणुका, तसेच नवीन कार्यकर्त्यांचे भव्य पक्ष प्रवेश घेणेबाबत जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे ठरले.
यावेळी पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड.वैभव काळे, शहराध्यक्ष अक्षय शेलार, ऍड. रियाज खान, विवेक बेडके, मयूर कांबळे, रोहित भोसले, रोहित पिल्ले,आण्णा घोडके,प्रज्वल भोसले, जितेंद्र कवडे, आकाश लांडगे, कृष्णा साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.