बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेत महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली.
बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या शुभहस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय सफाई कर्मचारी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विश्र्वास लालबिगे, नगरसेवक कुंदन लालबिगे, रत्नरंजन गायकवाड, रमेश मोरे, श्री.तोडकर, देवीदास साळुंके, संभाजी लालबिगे इ. मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करावी असा आदेश काढलेला असताना काही मुजोर शासकीय कर्मचारी व अधिकारी जयंती साजरी करण्यास उदासिनता दाखवत आहेत अशा मुजोर कर्मचारी व अधिकार्यांवर विधी व सेवेचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे हरिजन को-ऑप सोसायटीचे चेअरमन विश्र्वास लालबिगे यांनी सांगितले आहे.