बारामती(वार्ताहर): कोजागिरी शरद पौर्णिमा निमित्त खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जीवनातील येणार्या एकुण पौर्णिमापैकी 81 व्या वर्षांतील 1 हजार वी कोजागिरी/शरद पौर्णिमा निमित्त पंजाबी-सिंधी असोसिएशन तर्फे गुरूद्वारामध्ये साहेबाना अभिष्टचिंतन करून त्यांना पुढील आयुष्याच्या मनापासून खूप-खूप शुभेच्छा देऊन साहेब दीर्घायुष्य होवोत व त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी अंत:करणापासून प्रार्थना करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मोहन भटीयानी यांच्या कार्याची दखल घेत पुणे चांदणी चौक याठिकाणी यथोचित सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. पंजाबी-सिंधी असोसिएशनतर्फे सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेत सत्कार करण्यात आला. यावेळी पंजाबी सिंधी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.