बारामती(वार्ताहर): ज्या बारामतीत सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा लाभला आहे. त्या बारामतीचे सुपूत्र भारत सदाशिव चव्हाण यांना हरिश्र्चंद्र फाऊंडेशन, सोलापूरच्या वतीने राष्ट्रीय स्नेहबंद कलारत्न सन्मानाने गौरविण्यात आले.
17 ऑक्टोबर रोजी डॉ.निर्मलकुमार सहभागृह सोलापूर याठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे, हरिश्र्चंद्र फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा गायकवाड, पंढरीनाथ कदम, ऍड.भगवान मुळे, पुषपाताई सरगर, कृष्णा बोधले, डॉ.धनराज कदम, महादेव तळेकर, पत्रकार भरतकुमार मोरे, पुषांजली मराठे, ह.भ.प.एकनाथ म्हत्रे महाराज, समाधान गाजरे, नागनाथ गावडे, संगीता गुरव, कृष्णदेव गुरव हे मान्यवरांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.लोंढे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या पुरस्काराने व्यक्तींची भविष्यात काम करण्याची जबाबदारी अधिक वाढते. समाजात काम करीत असताना काहींना दुसर्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती असते. मात्र हरिश्र्चंद्र फाऊंडेशनसारख्या काही स्वयंसेवी संस्था निरपेक्षपणे समाजात चांगले काम करणार्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुरस्कार देत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
भारत चव्हाण यांनी आतापर्यंत विविध चित्रपटात, नाटकात, वेबसेरीज, अल्बममध्ये पार्श्र्वगायन करून युवकांना आपल्या अभिनय, गायनातून मंत्रमुग्ध केले आहे. या सर्व कार्याची दखल हरिश्र्चंद्र फाऊंडेशन ने घेऊन त्यांना सन्मानीत केले आहे. यापुर्वीही त्यांना कलाभूषण, कलारत्न, गाणरत्न, समाजभूषण, शिक्षकरत्न इ. पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
भारत चव्हाण यांना राष्ट्रीय स्नेहबंद कलारत्न सन्मानाने गौरविण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.